️शेतकरी व कर्मचारी यांची जबादारी

नैसर्गिक आपत्ती नुकसान अर्ज प्रकिया

1️⃣ 👨‍🌾 शेतकरी यांची जबाबदारी
  • नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या त्याच दिवशी अर्ज करणे आवश्यक.
  • ➤ तलाठी किंवा कृषी सहायक यांच्याकडे अर्ज सादर करणे.
  • ➤ नुकसान झालेले फोटो / व्हिडिओ / पुरावे जोडणे.
  • अर्जात नुकसान झालेल्या पिकाचा व क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख असावा.
2️⃣ 👨‍💼 तलाठी यांची जबाबदारी
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे शेत त्याच्याच मालकीचे आहे का हे तपासणे.
  • ➤ 7/12 उतारा
  • ➤ फेरफार नोंदी
  • ➤ खाते तपासून खात्री करणे.
  • पात्र अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे.
3️⃣ 🌾 कृषी सहायक यांची जबाबदारी
  • प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणे.
  • ➤ पिकाचे नुकसान टक्केवारीत (Percentage) ठरवणे.
  • पंचनामा अहवालात नुकसान अचूकपणे नमूद करणे.
4️⃣ 🏘️ ग्राम सेवक यांची जबाबदारी
  • पंचनामा प्रक्रियेमध्ये पंच म्हणून उपस्थित राहणे.
  • पंचनामा प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध होण्यास सहकार्य करणे.
⚠️ महत्वाची टीप :

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान हे आपत्ती झालेल्या दिवशीच स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे उशिरा सादर केलेले अर्ज स्विकारले जात नाहीत.

🌧️ नैसर्गिक आपत्ती माहिती

शासन मदत, पंचनामा व मार्गदर्शन

📸 आपत्ती फोटो गॅलरी

🌾 पिक नुकसान कसे ठरविले जाते?

📐
एकूण क्षेत्र

शेतकऱ्याचे एकूण पीक क्षेत्र (हेक्टर)

📉
नुकसान टक्केवारी

पंचनामा नुसार ठरवलेले % नुकसान

💰
पात्र क्षेत्र

ज्या क्षेत्रासाठी भरपाई दिली जाते

🧮 नुकसान गणना Calculator
0.00 हेक्टर
📊 उदाहरण – टेबल स्वरूपात
पीक क्षेत्र (हे.) नुकसान % पात्र नुकसान क्षेत्र (हे.)
सोयाबीन 1.00 30% 0.30
कापूस 0.40 नुकसान नाही 0.00 (वजा)
हळद 0.20 नुकसान नाही 0.00 (वजा)
एकूण पात्र नुकसान क्षेत्र 0.30 हेक्टर
📌 महत्वाची बाब :
ज्या पिकांचे नुकसान झालेले नाही (उदा. कापूस, हळद) त्या पिकांचे क्षेत्र नुकसान गणनेतून वजा केले जाते.
⚠️ अट :
शासन निर्णयानुसार किमान 33% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान असल्यासच मदत पात्र ठरते.