📄 जिवंत ७/१२

शासकीय निर्णयानुसार माहिती

जिवंत ७/१२ मोहीम (Phase 2) ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने १ एप्रिल २०२५ पासून राज्यभरात सुरू केलेली एक विशेष मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत सातबारा उताऱ्यावर मयत खातेदारांची नावे कमी करून वारसांची नावे लावणे, जुन्या नोंदी अद्ययावत करणे, जमिनीचे वारस नोंद करणे आणि चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे, ही कामे विनामूल्य केली जात आहेत
  • उद्देश:
    सातबारा उतारा 'जिवंत' (अद्ययावत) करणे, जेणेकरून जमिनीच्या व्यवहारात कायदेशीर अडचणी येणार नाहीत
  • १) अपाक शेरा कमी करणे :
    एखाद्या जमिनीवर नाव असलेल्या व्यक्तीची कोणती व्यक्ती कायदेशीर अज्ञान (१८ वर्षांखालील) असल्यास, त्याच्या वतीने पालक म्हणून नाव ७/१२ उताऱ्यावर लावण्यात येते. वय पूर्ण झाल्यानंतर ७/१२ उताऱ्यावरून अज्ञान पालक काढून टाकून संबंधित व्यक्तीचे नाव नोंदवणे आवश्यक आहे.
  • २) भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार अंमल :
    भूसंपादन प्रक्रियेनंतर दिलेला निवाडा आणि जमिनीच्या वापरातील बदल (शेतीमधून बिगरशेती) यानुसार ७/१२ उताऱ्यावर नोंद घेण्यात यावी.
  • ३) पोट खराब वर्ग अ क्षेत्र रूपांतर :
    पूर्वी पोट खराब (लागवडीस अयोग्य) म्हणून वर्गीकृत जमीन सुधारून लागवडीयोग्य केल्यास, त्या क्षेत्राची नोंद ७/१२ उताऱ्यावर घ्यावी.
  • ४) नियंत्रित सत्ता प्रकार पडताळणी :
    जमिनीच्या मालकी हक्कांवरील निर्बंध (उदा. कुळ कायदा, देवस्थान जमीन इ.) यांची योग्य पडताळणी करून ७/१२ उताऱ्यावर नोंद अद्ययावत करावी.
  • ५) भोगवटदार वर्ग १ व २ स्वतंत्र नोंद :
    जमिनीच्या मालकी हक्कानुसार भोगवटदार वर्ग १ (पूर्ण हक्क) व वर्ग २ (मर्यादित हक्क) असे स्वतंत्रपणे ७/१२ उतारे तयार करणे.
  • ६) अंतिम निस्तार पत्रकानुसार नोंदी :
    गावातील सार्वजनिक जागा जसे स्मशानभूमी, रस्ते, पाण्याचे हक्क इत्यादींच्या नोंदी अधिकार अभिलेखात समाविष्ट करणे.